Ads

अवैध रेती तस्करी करणाऱ्या हायवा ट्रक भद्रावती पोलिसांनी पकडला


भद्रावती (तालुका प्रतिनिधी) ;-
दिनांक २३.११.२०२१ रोजी रात्री ०९.०० ते १०.०० वा दरम्यान पोलीस स्टेशन भद्रावती गुन्हे शोध पथकाला मुखबिराकडुन माहिती मिळाली की, एक पांढ-या रंगाचे १० चक्का हायवामध्ये तेलवासा वरुन मंजुषा लेआऊटकडे रेतीची अवैध वाहतुक होणार आहे. अशा खबरेवरून पोलीस स्टॉपसह शुभप्रसंग लॉन येथे नाकाबंदी केली असता एक हायवा क्र एम एच ३४ बी जी ८३३१ हा मंजुषा लेआऊटकडे येतांना दिसला. त्यास पोस्टॉप चे मदतीने थांबवुन हायवा क्र एम एच ३४ बी जी ८३३१ चे चालकास त्याचे नांव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नांव किरण पितांबर शाहु, वय ३६ वर्षे, रा. शिवाजी नगर, भद्रावती  सांगितले त्याच्या ताब्यातुन वाहतुकीस वापरलेला हायवा क्र एम एच ३४ बी जी ८३३१ किमत १०,००,००० व रेती ५ ब्रॉस कि २५००० रु असा एकुण १०,२५,००० रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. सदर रेती बाबत आरोपी चालकास विचारपुस केली असता आरोपी हा वासुदेव ठाकरे, रा भद्रावती यांचेकडे रोजीने असुन हायवा हा वासुदेव ठाकरे, रा.भद्रावती यांचा असल्याचे सांगीतले वरुन आरोपी चालक किरण पितांबर शाहु यास अटक करण्यात आलेली असुन गुन्हयातील आरोपी हायवा मालक वासुदेव ठाकरे, रा.भद्रावती हा घटनेपासुन फरार आहे..
वासुदेव ठाकरे हा कृषी उत्पन्न बाजार समिती चा सभापती आहे आणि त्यांनी पिपरी घाट वरून हजारो ब्रास रेतीची अवैध रित्या उत्खनन केल्या ची परिसरात चर्चा आहे .या पूर्वी सुद्धा अवैध रेती तस्करी मध्ये वासुदेव ठाकरे वर गुन्हा दाखल झाला आहे. महसूल विभाग कुंभकर्ण झोपेत आहे आणि उघड्या डोळ्यांनी खनिज संपदाची लूट बघत आहे.Bhadravati police nab highway truck smuggling sand

सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अरविंद साळवे सा. अपर पोलीस अधिक्षक अतुल कुळकर्णी सा., उपविभागीय पोलीस अधिकारी सुधिर नदंनवार सा, यांचे मार्गदर्शनात पो.नि. गोपाल भारती, गुन्हे शोध पथकातील पोउपनि अमोल तुळजेवार, पोकॉ/१२४७ शशांक बदामवार यांनी केली आहे.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment