चंद्रपुर :-चंद्रपूर जिल्हा व सत्र न्यायालय परिसरात सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या दोन नागरिकांविरोधात महानगरपालिकेच्या पथकाने चारशे रुपयांचा दंड आकारला. मा. मुख्य न्याय दंडाधिकारी एस. एम. काळे यांनी थुंकणाऱ्या नागरिकांना दोन तासांसाठी कोठडीत ठेवण्याची शिक्षा सुनावली.
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची तरतूद आहे. असे असतानाही अनेक जण सार्वजनिक ठिकाणी थुंकतात. अशांवर निर्बंध घालण्यासाठी माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई केली जात आहे. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्याच्या लोकांच्या सवयीला आळा घालण्यासाठी आणि मास्कची सवय लावण्यासाठी आता चंद्रपूर महानगर पालिका कठोर करीत आहे.
0 comments:
Post a Comment