Ads

भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल ..

वरोरा - वरोरा तालुक्यात उपविभागीय पोलीस अधिकारी IPS आयुष नोपाणी रुजू झाल्यावर तालुक्यात सुरू असलेल्या अवैध रेती घाटावर कारवाई करण्याचा सपाटा सुरू केल्यावर अवैध वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात बंद झाली होती, नोपाणी यांच्या दबंग भूमिकेमुळे अनेकांनी अवैध धंदे सुद्धा स्वतः बंद केले होते, मात्र त्यानंतर वरोरा तालुक्यात वाळू घाट चालकांना एका डॉक्टरने रंगदारी मागीतल्याची खळबळजनक बाब उघडकीस आली आहे, याप्रकरणात वाळू घाट चालक शुभम चांभारे यांनी त्या डॉक्टरवर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे.
A case of extortion has been registered against Dr. Narendra Date of Bhadravati
29 वर्षीय शुभम चांभारे मागील 4 ते 5 वर्षांपासून रेतीचा व्यवसाय करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात, मात्र इतक्यात भद्रावती येथील डॉ. नरेंद्र दाते यांनी चांभारे यांच्या राळेगाव रिट भद्रावती येथील वाळू घाटावर जात त्याठिकानचे फोटो काढत सुपरवायझर आशुतोष घाटे याला धमकविण्याचे प्रकार सुरू केले.

डॉ. दाते हा महिन्याभरापासून चांभारे यांच्या वाळू घाटावर जात त्यांना पैश्यासाठी त्रास देत होता, इतकेच नव्हे तर दाते हा इतरांकडून चांभारे यांना माहिती पाठविण्याचे काम करायचा की कलेक्टर, SDPO, SDO व तहसीलदार यांचे डॉ. दाते सोबत चांगले संबंध आहे, कारवाई टाळायची असेल तर सर्व अधिकाऱ्यांना सांभाळण्यासाठी दाते यांनी 7 लाख रुपयांची खंडणी चांभारे यांना मागितली होती.
चांभारे यांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले, मात्र 9 जून ला सकाळी 12 वाजेदरम्यान डॉ. दाते यांनी सुपरवायझर घाटे याला कॉल करीत मी कलेक्टर सहित सर्व अधिकाऱ्यांना सांभाळतो त्याकरिता मला आता 32 हजार रुपये RTGS किंवा फोन पे द्वारे ट्रान्सफर करा, हे सर्व संभाषण चांभारे यांनी आपल्या मोबाईल मध्ये रेकॉर्ड केले.
त्यानंतर या सर्व प्रकरणाची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनमध्ये चांभारे यांनी केली, वरोरा पोलिसांनी कलम 385 अनव्ये डॉ. नरेंद्र दाते यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पोलीस उपविभागीय अधिकारी आयुष नोपाणी म्हणाले की...
सदर गुन्हा हा जामीनात मोडत असल्याने डॉ. दाते यांना अद्याप अटक करण्यात आली नसून त्यांना चौकशीसाठी पोलीस स्टेशनमध्ये बोलाविण्यात आले आहे, त्यांच्या आवाजाचे नमुने तपासण्याचे काम पोलीस करणार आहे, सोबतच याआधी त्यांनी असाच कुणाला पैश्यासाठी त्रास दिला आहे का? याबाबत तपास करण्यात येणार आहे, जर तपासात पुन्हा काही नवी माहिती मिळाली तर त्याच्यावर योग्य कारवाई करण्यात येणार.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment