Ads

बोंढार हत्याकांडातील आरोपींवर कठोर कारवाई करा.

भद्रावती तालुका प्रतिनिधी:
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती नांदेड जिल्ह्यातील बोंढार या गावी अक्षय भालेराव या युवकाच्या नेतृत्वात साजरी करण्यात आली म्हणून त्याची निर्घुनपणे हत्या करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्राला काळीमा फासणारी असून या हत्याकांडातील सर्व दोषींना अटक करून व या हत्याकांडांच्या मुख्य सूत्रधाराचा शोध घेऊन या सर्वांवर कठोर कारवाई करून त्यांची मालमत्ता जप्त करण्यात यावी ,तसेच या हत्याकांडाचे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी शहरातील बहुजन वंचित आघाडीतर्फे भद्रावती येथील तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या एका निवेदनातून करण्यात आली आहे.Take strict action against the accused in Bondhar massacre.
नांदेड जिल्ह्यातील मौजा बोंढार गावातील वंचित बहुजन आघाडीचे ग्राम शाखा महासचिव अक्षय भालेराव यांनी गावात डॉक्टर आंबेडकर जयंती साजरी केल्याच्या रागावरून अक्षय भालेराव यांची निर्घुण हत्या करण्यात आली असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. अक्षय भालेराव यांची हत्या करणार्‍या उर्वरित हत्यारांना व मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यावी,या प्रकरणाचा तपास प्रामाणिकपणे व तटस्थपणे करावा, यासाठी विशेष सरकारी वकीलाची नियुक्ती करण्यात यावी, हे संपूर्ण प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन सादर करताना शहरातील वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Share on Whatsapp

About The Chandrapur Times

यह पोर्टल संपादक, मालिक, प्रकाशक राजेश सनमाहेन सोलापनद्वारा कार्यालय साप्ताहिक दि चंद्रपुर टाइम्स, आक्केवार वाडी, वॉर्ड नं. १, चंद्रपुर, से प्रकाशित किया गया है । प्रकाशित किसी भी लेखन सामग्री पर संपादक सहमत ही हो यह आवश्यक नही । प्रकाशित कि सी भी लेखनपर आपत्ती हाने पर उनका निस्तारण सूचना प्रौद्योगिकी (प्लेटफ़ॉर्म दिशानिर्देश और डिजिटल मीडिया आचार संहिता) विनियम 2021 के तहत किया जायेगा ।

0 comments:

Post a Comment