जावेद शेख तालुका प्रतिनिधी भद्रावती: इंटकच्या राष्ट्रीय कोयला खदान मजदूर संघातर्फे माजरी येथील इंटकच्या क्षेत्रीय कार्यालयात दिनांक 10 रोज शनिवारला दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.Tribute to late MP Balu Dhanorkar by INTUC Mazdoor Sangh.
यावेळी वेकोली इंटकचे अध्यक्ष तथा माजी आमदार एस. क्यू.जमा, महासचिव के.के.सिंह, वीरेंद्रसिंहष बल्लारपूर क्षेत्राचे अध्यक्ष आर. शंकर दासष नदीम जमा, माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार, सचिव परमानंद चौबे, संजय दुबे, हंसराज पारखी, बाबा अस्वले, रामप्रकाश पांडे, छगन चरडे, बळवंत बदकी, धनराज रणदिवे, विनोद बनसोड,बाळकृष्ण बहादे, कृष्णा चांभारे, वामन खिरटकर, संजय बोढकर, भारत खापने, सुरेंद्र सिंह, प्रमोद सातपुते ,जितेंद्र सिंह, जितेंद्र चिंचोलकर, शरद बोबडेष रत्नाकर पांडे, मुरलीसिंह, राजाराम ऊईके, मनोज गुप्ता, गोला कुमरय्या, अतुल कुमार गुप्ता ,अनिल सिंह, अनिल गावंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी वेकोली इंटकचे अध्यक्ष जमा यांनी बाळू धानोरकर यांच्या रूपाने लोकांसाठी धडपडणारा व धडाडीचा नेता हरपला असल्याच्या शोक संवेदना व्यक्त केल्या. तर खासदार बाळू धानोरकर यांच्या अकाली निधनामुळे जिल्ह्यात राजकीय पोकळी निर्माण झाल्याचे मत माजरी क्षेत्राचे अध्यक्ष धनंजय गुंडावार यांनी आपल्या शोक संवेदनातून व्यक्त केले.सदर श्रद्धांजली कार्यक्रमाला वेकोली कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 comments:
Post a Comment