बल्लारपुर :- बल्लारपुर येथे दि. 13/10/2024 चे सायंकाळी 17/30 वा. ते 18/00 वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त खबरेवरून कश्मीरसिंग महेंद्रसिंग बावरी, रा. फुकटनगर, बामणी, बल्लारपुर, जि. चंद्रपूर याचे राहते घरी कायदेशिर कियारितीप्रमाणे घरझडती घेतली असता एक जुने वापरते लोखंडी धातूचे देशी बनावटीसारखे सिंगल बॅरल व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) 07 mm पिस्तूल किंमत 10,000/-रू. घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पोस्टेला अप क 958/2024 कमल 3, 25 भारतिय हत्यार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
Ballarpur police seized two country-made pistols
तसेच दि. 14/10/2024 चे रात्री 00/15 वा. ते 00/50 वा. दरम्यान मिळालेल्या गुप्त खबरेवरून 01) आकाश बाबूराव चाफले, वय 24 वर्ष, 02) प्रणय मारोती जुनघरे, वय 23 वर्ष, दोन्ही रा. सुब्बई, ता. राजूरा, जि चंद्रपूर, 03) पलविंदरसिंग चॉदसिंग बावरी, रा. कन्नमवा वार्ड, बल्लारपुर, जि. चंद्रपूर यांना ताब्यात घेवून आकाश बाबूराव चाफले याचे ताब्यातून कायदेशिर कियारितीप्रमाणे एक जुने वापरते लोखंडी धातूचे देश बनावटीसारखे सिंगल बोअर व खाली मॅगझीन असलेले (अग्नीशस्त्र) 07 mm पिस्तूल किंमत 25,000/-रू. घटनास्थळ जप्ती पंचनाम्याप्रमाणे जप्त करून पो स्टे ला अप क 959/2024 कमल 7, 27 भारतिय हत्यारकायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदर कार्यवाहीत एकुण चार आरोपींना ताब्यात घेवून अटक करण्यात आली. सदर गुन्हयाचा तपास सुरू आहे.
सदर ची कार्यवाही ही मा. पोलीस अधिक्षक श्री. मुम्मका सुदर्शन सा. मा. अपर पो. अधिक्षक रिना जनबंधु मॅडम, श्री. दिपक साखरे सा. उपविभागिय पो अधिकारी, राजूरा यांचे मार्गदर्शनात पो. निरिक्षक सुनिल विठ्ठलराव गाडे, स.पो.नि. ए.एस. टोपले, पो.उप.निरिक्षक हुसेन शहा, स.फौ. गजानन डोईफोडे, आनंद परचाके, पोहवा. रणविजय ठाकूर, सत्यवान कोटनाके, संतोष दंडेवार, सुनिल कामतकर, पुरुषोत्तम चिकाटे, पो. अंमलदार शेखर माथनकर, शरदचंद्र कारूत्र, विकास जुमनाके, वशिष्ठ रंगारी, मिलींद आत्राम, खंडेराव माने, लखन चव्हान, मु.पो. अंमलदार अनिता नायडू, तसेच चालक पो अंमलदार विकास खंदार, इत्याईी पो. स्टाफ यांनी अतिशय कुचलतेने गुन्हा उघडकीस आणला आहे.
0 comments:
Post a Comment